*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उगवतीच्या वाटा*
रडू नका कुढू नका
अंधारात दडू नका
नैराश्याच्या ओझ्याने
घरटे आपुले मोडू नका
कबूल आहे खड्डे आहेत
इकडे विहीर तिकडे आड
काळोख आहे कभिन्न
दिसत नाही कुठे झाड
तरी कधीही तुम्ही
थांबवू नका चालणे
ध्यानात ठेवा उजेडही असतो
तसेच असते चांदणे
अंधाराला तुडवित जे
चालत चालत जातात
उगवतीच्या वाटा त्यांच्या
पायाखाली येतात
कवयित्री
अनुपमा जाधव