You are currently viewing महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा विजय ही तर बदलाची सुरुवात; अर्चना घारे परब

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा विजय ही तर बदलाची सुरुवात; अर्चना घारे परब

*महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा विजय ही तर बदलाची सुरुवात; अर्चना घारे परब

लोकशाहीमध्ये निवडणुकीत हार-जीत होत असते. यात नाराज व्हायचे नाही. संयम सोडायचा नसतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेल्या सर्व मतदार, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी, तसेच महिला, माता भगिनीं यांचे सौ. अर्चना घारे परब यांनी आभार मानले. तसेच विजयी उमेदवार खा. श्री. नारायण राणे यांचे देखील अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील यश ही बदलाची सुरुवात आहे. महाविकास आघाडीचा विजय आमच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. उत्साह वाढवणारा आहे. असे मत व्यक्त करून महाराष्ट्रात विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचं त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आपल्याला अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडे दिग्गज नेते होते. मागील विधानसभा निवडणुकीतील पहिल्या दोन क्रमांकाचे मतदान घेणारे उमेदवार होते. मागील विधानसभेतील दोन्ही उमेदवाराच्या मतांची बेरीज जवळपास सव्वा लाख होत असताना फक्त ८५ हजार मत महायुतीला घेता आली.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विनायक राऊत यांना चांगली साथ दिली‌. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील अशी भावना यावेळी सौ. अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा