पैसे घेऊन नियुक्त्या देण्याऱ्या रॅकेट वर कठोर कारवाई करा – प्रसाद गावडे
कुडाळ
सुरक्षा रक्षक नियुक्त्यांमागे सुरक्षा रक्षक संघटनेतील दलालांकरवी “मलई” लाटली जाते हे ठळकपणे अधोरेखित..होत आहे. त्यामुळे पैसे घेऊन नियुक्त्या देण्याऱ्या रॅकेट वर कठोर कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी केली आहे. कारवाई झाली नाही तर येत्या १५ ऑगस्टला आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील गावडे यांनी दिला आहे.
प्रसाद गावडे यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, रत्नागिरी जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून सुरक्षा रक्षकांची पैशांसाठी आर्थिक व मानसिक पिळवणूक केली जात आहे. अगदी चारच दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या धरण प्रकल्पावर कार्यरत सुरक्षा रक्षक व सुरक्षारक्षक संघटनेतील एक कर्मचारी यांचे पैशांच्या मागणीसाठी आई बहिणी वरून शिवीगाळ करणारे ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने त्याचे पडसाद कणकवली येथे दोन गटांत राड्यामध्ये दिसून आले. या राड्यानंतर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला,मात्र संभाषणातील संवादानुसार संबंधित सुरक्षारक्षक संघटनेतील कर्मचाऱ्याकडून मागणी होणारे पैसे नेमके कोणासाठी जमवले जात होते, पैशांची देवाण-घेवाण करून नियुक्त देतो असे सांगताना यामागे कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात आहे? पाटबंधारे विभागाकडील तलाव प्रकल्पांवर नियुक्ती देताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीसाठी सामावून घेण्याचा निकष का ठेवला गेला नाही? “पैसे देणार नसेल तर तू राजीनामा दे तुझ्या जागी दुसरा उमेदवार नियुक्ती देतो” असे सांगत संबंधित संघटनेचा प्रतिनिधी कोणाच्या जीवावर धमकवतोय? “वरच्या साहेबांना पैसे द्यावे लागतात;मग हा वरचा साहेब आहे तरी कोण? सुरक्षा रक्षक मंडळातील भ्रष्टाचार प्रकरणाची दखल घेऊन उबाठा सेनेच्या पदाधिकऱ्यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा “मॅंन” का झाला? कणकवलीतील आमदार “निवासी” झालेल्या बैठकीनंतर भ्रष्टाचावार पांघरून घालण्यात आले का? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. खरं तर जिल्हा पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करण्याची गरज असून गरीब कष्टकरी सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी व पिळवणूक होत असताना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक या राड्यानंतर तरी गंभीर दखल घेणार का हा खरा सवाल आहे.
कणकवली येथील राडा प्रकरणानंतर सिंधुदुर्ग जिल्हा उबाठा सेनेने सुरक्षारक्षक मंडळाच्या नियुक्ती संदर्भात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक व अँटी करप्शन यांच्याकडे तक्रार देण्याचे जाहीर केले होते; मात्र सुरक्षारक्षक मंडळाचे वरिष्ठ अधिकारी व कणकवली स्थित आमदार यांच्यात झालेल्या खाजगी बैठकीमध्ये प्रकरण मिटवले गेले अशी जिल्ह्यात जोरदार चर्चा असून शासनाचे निकष डावलून व कोणतीही विहित कार्यपद्धती न अवलंबता 1 लाख 20 हजार ते दीड लाख रुपये उकळून नियुक्त्या दिल्याची जोरदार चर्चा असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प बसण्यामागे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नेमके कोणते हितसबंध जोपासले गेले आहेत? स्वाभिमानी कामगार संघटनेच्या वतीने यासंदर्भात कामगार आयुक्त महाराष्ट्र यांचेकडे रीतसर तक्रार देण्यात आलेलीअसून त्यावर कारवाई न।झाल्यास प्रसंगी 15 ऑगस्ट 2024 रोजी कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी दिला आहे.