You are currently viewing वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा माजी विद्यार्थी मेळावा

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा माजी विद्यार्थी मेळावा

मालवण :

 

१५ जून १९२६ साली १५ विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षण महर्षी डॉ. काकासाहेब वराडकर यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक कट्टा संचालित कट्टा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची स्थापना करण्यात आली. या शाळेला २०२६ मध्ये १०० वर्ष पूर्ण होत आहेत.

२०२६ मध्ये शतक महोत्सव साजरा करण्याकरिता पुढील कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून सर्व माजी विद्यार्थी यांना एकत्र करून शतक मोहत्सवी कार्यक्रमाची भव्य दिव्यता वाढविता येईल. याकरिता दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अजयराज श. वराडकर, श्री.सुनील नाईक, श्री.फनसेकर सर, श्री. सुधीर चं. वराडकर, श्री. दीपक भोगटे, श्री. गावडे सर, श्री. किनेकर मॅडम, श्री. आनंद वराडकर, तसेच कट्टा हायस्कूल, इंग्लिश मिडीयम चे मुख्याध्यापक, कट्टा कॉलेजचे प्राचार्य व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + twenty =