You are currently viewing ऑल दी बेस्ट रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

ऑल दी बेस्ट रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

’ऑल दी बेस्ट रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

दक्षिण आफ्रिकेत ९ जून रोजी होणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेसाठी सावंतवाडीतील ओंकार पराडकर आणि कुडाळ येथील प्रसाद कोरगावकर यांची निवड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पराडकर आणि कोरगावकर यांना शुभेच्छा देण्यासाठी सावंतवाडी येथे रविवारी ‘ऑल द बेस्ट रन’ आयोजित करण्यात आली होती. या रनमध्ये सिंधु रनर्स टीम, रांगणा रनर्स तसेच जिल्हयातील इतर सायकलस्वार एकत्रित आल्यामुळे ‘ऑल दी बेस्ट’ रनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सहापासून ही रन राजवाडा येथून सुरू झाली.यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणाऱ्या प्रसाद आणि ओंकार यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. स्नेहल गोवेकर, डॉ. शंतनू तेंडुलकर, डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. अनिष स्वार, डॉ. उमेश सावंत व अन्य धावक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा