You are currently viewing शासनाने कोकणातील प्रत्येक मंदिरासाठी किमान २५ लाखांचा निधी द्यावा…

शासनाने कोकणातील प्रत्येक मंदिरासाठी किमान २५ लाखांचा निधी द्यावा…

शासनाने कोकणातील प्रत्येक मंदिरासाठी किमान २५ लाखांचा निधी द्यावा…*

परंपरा जपण्यासाठी सिंधुदुर्गात निकष शिथील करण्याची मागणी…

सावंतवाडी

कोकणातील असलेली सर्व मंदिरे ही त्या काळच्या जनतेने स्वनिधी उभारुन बांधलेली आहेत. त्यामुळे त्या मंदिरांचे पुनर्जीवन करण्यासाठी शासनाकडुन प्रत्येक मंंदिराला किमान २५ लाखांचा निधी मिळावा, अशी मागणी आज येथे झालेल्या देवस्थान उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आली.

दरम्यान कोल्हापूर आणि सांगलीच्या धरतीवर सिंधुदुर्गातील मंदिरात होणारे कार्यक्रम हे वेगळे आहेत. त्यामुळे येथिल परंपरा टिकविण्यासाठी अटी शिथिल करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेगळे निकष लावण्यात यावेत, अशी ही मागणी करण्यात आली. माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत देवस्थान उपसमितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक आज तेली यांच्या निवासस्थांनी पार पडली. यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा