*”चलो जलाए दिप वहाॅ,जहाॅ अभीभी अंधेरा है|*
बजाजकडून साहसच्या काजू प्रक्रिया उद्योगासाठी तब्बल दोन कोटी सव्वीस लाख रुपये सिएसआर तीन वर्षासाठी मंजूर केला.
या देशातील उद्योग जगतातील अनेक उद्योगपती असे आहेत की जे आपल्या कमाईतील काही हिस्सा हा समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून कर्तव्य भावनेने खर्च करतात. त्यापैकी एक बजाज उद्योग समूह. बजाज उद्योग समूहाने गरजू मुलांच्या
सर्वागीण विकासासाठी तसेच अंध, अपंगांच्या पुनर्वसनासाठी, आरोग्यासाठी सदैव सढळ हस्ते मदत केलेली आहे.
गेली अडतीस वर्षाहून जास्त काळ स्वतःच्या अपंगत्वाचा कोणताही बाऊ न करता देशातील विविध भागातील अपंगांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्याना आत्मसन्मानाने जगता यावं यासाठी डॉ. नसिमा हुरजूक व त्यांचे सहकारी कार्यरत आहेत.
साहसच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे या गावात चोवीस वर्षांपूर्वी अपंगाच्या पुनर्वसनाचा ध्यास घेऊन नसिमादिदिनी सुमारे साडेबारा एकर जागेत सह्याद्रीच्या कुशीत त्या काळात कोणत्याही प्रकारची दळणवळणाची साधने नसताना अतिशय प्रतिकुल परिस्थितीत हे पुनर्वसन केंद्र सुरू केलं. ज्याचा लाभ आतापर्यंत असंख्य दिव्यांगानी घेतला आहे.
दिव्यांगाना आर्थिक द्रुष्टीने स्वावलंबी करता यावं यासाठी २००5 मध्ये प्राथमिक स्वरूपात काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. टप्याटप्याने त्याचा विस्तार झाला. अनेक दात्याच्या सहकार्याने विविध प्रकारची आवश्यक मशिनरी व सुमारे आठशे टन कच्चा काजू स्टाॅक करण्यासाठी गोडाऊन बांधले.
ग्रामीण भागातील दिव्यांग व रोड अपघातात कायमस्वरूपी चाकाच्या खूर्चीला खिळणारे असंख्य तरूण यांच्या पूनवर्सनासाठी दिदि व त्यांच्या टिमने 1 जूलै 2020 रोजी स्वप्ननगरी सोडून साहसची स्थापना केली. स्वप्ननगरी प्रकल्प
नवीन चालकाना 3 वर्षात यशस्वीपणे चालविणे शक्य झाले नाही. त्यामूळे त्यानी स्वप्ननगरी प्रकल्प साहसला तो प्रकल्प 5 वर्षासाठी चालविण्याची विंनती केली. व 1 मे 2023 रोजी त्यांच्या विंनतीचा स्विकार करून दिव्यांगासाठी हे आव्हान स्विकारले . साहसच्या ईच्छाशक्ती, प्रयत्नाने बजाज उद्योग समूहाने दिव्यांगासाठी चालविलेल्या त्यासाठी गेल्या दोन वर्षापासून साहसचे विश्वस्त म़डळ विविध स्तरावर प्रयत्न करत होते. पण वयाच्या ७५ व्या वर्षीही जिद्द आणि प्रचंड उर्जा असलेल्या डॉ. नसिमादिदिनी प्रयत्न थांबवले नाहीत आणि शेवटी मार्ग सापडला. साहसने( SAAHAS.. DISABILITY RESEARCH AND CARE FOUNDATION) बजाज उद्योग समुहाला विनंती केली आणि बजाज उद्योग समूहाने दिव्यांगानी चालवलेल्या या प्रकल्पासाठी तब्बल दोन कोटी सव्वीस लाख रुपये एवढा सिएसआर तिन वर्षा साठी मंजूर केले.
बजाज उद्योग समूहाचे सिएसआर विभागाचे अध्यक्ष मा. कृष इरानी, सिएसआरच्या प्रमुख श्रीमती अमन प्रित कौर, सिएसआरच्या वरिष्ठ युनीट प्रमुख श्रीमती श्रृती गौर यांनी सदर प्रक्रिया उद्योगाला प्रत्यक्ष भेट देवून आज पहाणी केली. या भेटीत सर्व प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. एकूण मंजूर निधीपैकी कच्चा काजू बी व खरेदी इतर खर्चासाठी एक कोटी दहा लाखाचा पहिला हप्ता साहसला अदा केला. या भेटीच्या वेळी साहसच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नसिमादिदि, खजिनदार श्री अजीज हुरझुक, साहसचे विश्वस्त अॅड नकुल पार्सेकर, श्री साताराम पाटील , चार्टर्ड अंकाऊटंट श्री के डी. पाटील. काजू प्रक्रिया उद्योग निरिक्षक सौ. मधुताई आदि उपस्थित होते. कोरोना आपत्तीमुळे अडचणीत सापडलेला हा उद्योग आणि पंच्याहत्तर दिव्यांगाचा निर्माण झालेली रोजगाराची मोठी समस्या बजाज उद्योग समुहाने मदतीचा हात देवून दुर केली यासाठी साहसने बजाज उद्योग समूहाचे आभार मानले.
*संवाद मिडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢
*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩⚕👩⚕_*
*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*
https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने
_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_
_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩⚕👩⚕
_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩⚕👩⚕
*👩🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨⚕️_
*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*
*🏥आमचा पत्ता:-*👇
*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*
*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*