You are currently viewing स्वर्गीय डाँ. द.भि. तथा बाबा खानोलकर यांच्या जनसेवा निधी, बांदा या संस्थेमार्फ़त दिले जाणारे यावर्षीचे पुरस्कार जाहिर

स्वर्गीय डाँ. द.भि. तथा बाबा खानोलकर यांच्या जनसेवा निधी, बांदा या संस्थेमार्फ़त दिले जाणारे यावर्षीचे पुरस्कार जाहिर

बांदा
बांदा दशक्रोशीतील सेवाभावी व्यक्तीमत्व स्वर्गीय डाँ. द.भि. तथा बाबा खानोलकर यांच्या जनसेवा निधी ,बांदा या संस्थेमार्फ़त दिले जाणारे यावर्षीचे पुरस्कार जाहिर करण्यात आले. यंदाचे पुरस्कार सोहळ्याचे ३३ वे वर्ष आहे.

यावर्षीचा आदर्श प्राथमिक शिक्षिक पुरस्कार बांदा केंद्र शाळा नं.१ प्रशाळेचे उपशिक्षक जे.डी.पाटील, माध्यमिक आदर्श शिक्षक पुरस्कार नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीच्या शिक्षिका विशाखा विश्राम पालव यांना, तर आदर्श समाजसेवक पुरस्कार सावंतवाडी येथिल संजू विरनोडकर यांना, आदर्श हायस्कूल मुख्याध्यापक पुरस्कार श्रीराम माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पडेल, देवगड या प्रशालेचे मुख्य‍ाध्यापक दिलिपकुमार हरी फडके यांना जाहिर झाला आहे . तसेच या सोहळ्यात यांना गौरविण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 14 =