You are currently viewing श्री टागोर माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल

श्री टागोर माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल

भोसरी, इंद्रायणी नगर-(प्रतिनिधी)

इंद्रायणी नगर येथील श्री टागोर माध्यमिक विद्यालयाचा सालाबाद प्रमाणे याही वर्षी दणदणीत गुणवत्ताधारक शंभर टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेला एकूण 50 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 90 टक्के च्या वरती तब्बल 9 विद्यार्थी तर 80 टक्के च्या वर 27 विद्यार्थी आणि विशेष प्रावीण्य मध्ये 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयामध्ये मुरमे समर्थ 95 टक्के घेऊन प्रथम आला आहे, तर कु कदम सानिका 92 टक्के द्वतीय आली आहे आणि कु माने कीर्ती हिने 91 टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर श्रेया पैठणकर 90.80 टक्के गुण मिळवले आहेत त्याच बरोबर विद्यालयातील भोंडवे दिव्या 90 टक्के, मदने साक्षी 90 टक्के, यादव आदित्य 90 टक्के, संचेत थोरात 90 टक्के, वैभव असलकर 90 टक्के, पाटील स्नेहल 89 टक्के,संजना उबाळे 89 टक्के तर रेहन पठाण ने सुध्धा 89 टक्के घेऊन उत्कृष्ट गुण घेऊन प्राप्त केले आहेत.

या उत्कृष्ट निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे पाटील चेअरमन अण्णासाहेब मगर सहकारी बँक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिंनंदन करून भावी वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे मार्गदर्शक सचिव सुरेश फलके यांनी विद्यार्थ्यांनी सतत गुणवत्ताधारक असेल पाहिजे असा संदेश मुलांना दिला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष महेश घावटे सर,युवा नेते युवराज लांडे, सूरज लांडे स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष सूरज शेठ लांडे, मुख्याध्यापक संतोष काळे प्राथमिक चे मुख्याध्यापक हनुमंत शंकर आगे, मुख्याध्यापक उद्धव ढोले, मुख्याध्यापक मनीषा गुरव, शशिकांत ताठे, दिलीप पाटील, सहशिक्षक सुलाखे संतोष, खंदारे रवी, बुळे विठ्ठल, पाटोळे माया यांनी मुलांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. त्या बद्दल त्यांचे ही अभिनंदन करण्यात आले. दिलीप पाटील,गणेश फुगे, मस्तूद आबासाहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा