You are currently viewing रोटरी क्लब तर्फे चौकुळ चुरणीचीमुस वाडीतील प्रत्येक घराला प्रेशर कुकर भेट…

रोटरी क्लब तर्फे चौकुळ चुरणीचीमुस वाडीतील प्रत्येक घराला प्रेशर कुकर भेट…

रोटरी क्लब तर्फे चौकुळ चुरणीचीमुस वाडीतील प्रत्येक घराला प्रेशर कुकर भेट…

सावंतवाडी

रोटरी क्लब, सावंतवाडीने चुरणीचीमुस – चौकुळ येथील ही एक वाडी पुर्ण विकसित करण्याचा चंग बांधला आहे. यापुर्वी या वाडीतील रहिवाशी आणि भगिरत ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातुन बायोगगॕस बांधुन अलीकडेच सुपुर्द करण्यात आले. आणि त्यांची गरज लक्षात घेऊन बायोगगॕसच्या उदघाटनासाठी आलेल्या रोटरी डिस्ट्रीक्ट -3170 चे गव्हर्नर रो.नासीर बोरसदवाला यानी त्यावेळी सर्व घराना प्रेषर-कुकर देण्याचे आश्वासन दिले होते ते त्यानी पुर्ण करुन हॉकिन्स कुकर भेट दिले. या कूकर देण्यात भगीरथ प्रतिष्ठान चाही आर्थिक सहभाग घेतला.

रोटरी क्लब, सावंतवाडीने भगिरत प्रतिष्ठानच्या सहकार्याने प्रशिक्षण आयोजित केले. यावेळी श्री. गुलाबराव गावडे उपस्थित होते. भगिरत ग्रामविकास प्रतिष्ठानचे श्री.नविन मालवणकर यानी तेथील हे कुकर वापरणा-या भगिणींना कुकर वापरण्याचे प्रात्यक्षित देत यात तयार केलेला चवदार पुलाव सर्व उपस्थितांना खायला दिला. यावेळी रोटरी सचिव रो.प्रविण परब यानी प्रास्ताविक केले.
भगिरत ग्रामविकास प्रतिष्ठान चे श्री.नविन मालवणकर यानी खुसखुषीत भाषेत भगिरत प्रतिष्ठानचे कार्य पद्धती कथन केले. रोटरी अध्यक्ष रो.सुहास-सातोस्कर यानी यावाडीच्या उत्कर्षातुन एका समाजाला कशी नवी दिशा मिळू शकते यावर सविस्तर विवेचन केले. त्यानंतर सर्व लाभार्याना प्रेषर-कुकरचे वाटप करण्यात आले. आणि आभार प्रदर्शन गुलाबराव गावडे यांनी आभार मानले आणि याकार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी ग्रामस्थ, भगिरत ग्रामविकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, रो.अनंतराव उचगावकर, रो.प्रमोद भागवत, रो.आनंद रासम आणि रो.दिलीप म्हापसेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा