*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम लेख*
*महापौर शब्दाचा जन्म*
दारावर मोठ्या सोनेरी अक्षरात पाटी डगवलेली होती ‘गणपत महादेव नलावडे मेयर’ . गणपतरावांनी एकवार पाटीकडे नजर टाकली आणि आत कार्यालयात प्रवेश करते झाले. गेले चार दिवस ते रोज ही पाटी पाहत होते. ते पुण्याचे मेयर होऊन चारच दिवस झाले होते त्यांना! कार्यालयात टेबल खुर्च्या आणि इतर साधने आहेत म्हणून त्याला कार्यालय म्हणायचं नाही तर पुष्प भांडार झालं होतं त्यांचं! हाsss पुष्पगुच्छांचा ढीग! हार – तुरे, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू तर वेगळ्याच!
गणपतरावांनी खिन्न पणे एकवार सगळीकडे नजर टाकली. त्यांना सारेच निरर्थक वाटत होते.
जागेवर बसल्या बसल्या न राहवून त्यांनी शिपायाला हाक मारली आणि विचारलं ही एवढीच पत्र आली आहेत का रे. नीट आठवून सांग एखादं पाकीट म्हणा पत्र म्हणावा गुच्छा सोबत येते तशी चिठ्ठी म्हणा नजरेतून सुटली तर नाही ना रे तुझ्या? तू म्हणाला नाही जी म्या सोताच तर डाक वाल्याकडून सारी लावून ठेवली आहे इथं. ह्यावर गणपतरावांचा चेहरा पडला असावा कारण शिपायाने ताबडतोब विचारले कोणता खास सांगावा यायचा हुता का?!
नाही काही नाही! ‘ साहेब माझ्याकडन काही चूक झाली का?’ नाही नाही!, अरे खरच तसं काही नाही. जा तू!’ गणपतराव वरमले. आपण जरा जास्तच करत नाही ना, असंही क्षणभर वाटून गेलं त्यांना! ‘ अरे ऐक आता मी काम करणार आहे. आज कोणाच्या गाठीभेटी ठरल्या नाहीयेत ना? ठीक आहे तर, आता कोणाला आत सोडू नकोस.
गणपतरावानी स्वतःला कामांमध्ये बु डवून घेतले जणू समाधीच लागली त्यांच! कसल्याशा कोलाहलाने त्यांची समाधी भं गली. मग त्यांना जाणवलं कार्यालयाच्या दाराशी दोन व्यक्ती वाद घालत आहेत. गणपतरावानी जागेवरून विचारलं काय चाललय रे कोण आहे? शिपाई धावतच आत आला पाठोपाठ एक कार्यकर्त्या सारखा दिसणारा मनुष्य ही आत आला. शिपाई सांगू लागला साहेब पहा ना,’ तुम्हीच म्हनले होते ना कोणाला आज सोडू नकोस म्हणून!तर हे साहेब ऐकेनात काय तर म्हणे टपाल द्यायचे आहे म्या म्हणलं ‘ टपालच आहे नव्ह मग द्या कि माझ्यापाशी, मी देतो नंतर! तर म्हणलं न्हाय हिंदू महासभेच्या हापिसातून आलोय अन महत्त्वाचा सांगावा द आहे, तम्हाला आज द्यायचा म्हणत्यात, गणपतरावांनी आपाद मस्तक त्या व्यक्तीला न्याहाळलं हिंदू महासभेच्या कार्यालयातून आल्याचं म्हणतो हा माणूस! मग आपण कधी पाहिल्यासारखं का वाटत नाही त्याला? तो उत्साही स्वरात सांगू लागला ‘ मी रवींद्र जगताप, राजापूरला असतो. नुकताच मुंबईला आलो आहे शिकायला! राजापूरला असल्यापासून हिंदू महासभेचे काम करतो मी! तर काल संध्याकाळी तात्यारावांनी बोलावून घेतलं गणपतरावांनी कान टवकारले समोरचा बोलतचं होता तात्यारावांनी त्यांना पत्र देण्याबद्दल विचारलं होतं तो सांगतच होता, मी म्हटलं देईन की त्यात काय आता साक्षात स्वातंत्र्य लक्ष्मीचीच सेवा करायची संधी म्हणजे, साक्षात स्वातंत्र्य वीरांची सेवा करण्याची संधी. तर हे महाशय आत सोडेनात साहेब आत कामात आहेत म्हणे! मला सांगा सावरकरांच्या निरोपापेक्षा अजून कोणतं काम महत्त्वाचं असणार आहे? घ्या sss असं म्हणून जगतापने पत्र गणपतरावांच्या दिशेने सरकवलं. गणपतरावांनी शिष्टाचाराप्रमाणे चहा विचारला, त्यांना गडबडीत असल्याचं सांगितल्यावर पुन्हा येण्याचं आमंत्रण दिलं. पुढच्या वेळेस हे आले तर अडवू नकोस त्यांना, ते पाहुणे आहेत आपले! असं शिपायाला सांगितलं. शिपाई बाहेर गेला. आपल्याला मोठा मान मिळतोय म्हणून जगतापही छाती फुगवून गेला. दोघे निघून गेल्यावर गणपतरावांनी अक्षरशः झडप घालून ते पत्र घेतलं आपल्या गुरूंच पत्र! साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पत्र! गेले चार दिवस अनेकांची, नेत्यांची, शुभेच्छापत्र येत होती पण त्यांची नजर लागली होती याच पत्राकडे! वाटत होतो धावत जाऊन त्यांना सांगावं तात्याराव बघा! ‘मी मेयर झालोय’ विदवत जनांच्या पुणे नगरीनं हिंदू महासभेच्या बाजूने कौल दिलाय. तुमचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारण्याच्या मार्गात , आज अजून एक पाऊल पुढे टाकलय आपण! त्या पावलात कणभर का होईना तुमच्या शिष्याचा वाटा आहे तात्याराव! ‘ गणपतरावानी थरथरत्या हातानि ते पत्र एकवार भाळी लावलं. मग हलक्या हाताने ते पत्र फोडलं. आज सावरकरांनी स्वहस्ते लिहिलेला कागद! पत्राच्या सुरुवातीस नेहमीच्या सवयीने लिहिलेला ‘श्रीराम’ कडे त्यांनी किंचित काळ डोळे भरून पाहिले. बहुदा त्यांना सावरकरांची छबी दिसली असावी. ते वाचू लागले.
प्रति – श्री गणपत महादेव नलावडे यान सप्रेम नमस्कार,
पुण्याची धुरा आता समर्थ Don’t आली आहे म्हणायची! तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच यात मला शंका वाटतं नाही, तुम्हाला या जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! खरं म्हणजे मी तुमची क्षमा मागायला हवी पत्र पाठवायला अंमळ, नव्हे बराचसा उशीर झालाय पण काय करू? तुम्हाला माझे हे भाषाशुद्धीचे धोरण ठाऊक आहे. ज्यांच्याशी भांडायचं त्याचं इंग्रजाला आपल्या देशी भाषांचा भ्रतार बनवायचं?? तेही आपल्या देशी भाषा स्वतःच अतिशय संपन्न आणि सामर्थ्यवान असताना? आपणच परकीय शब्द घुसळून आपल्या वैज्ञानिक आणि अर्थवाही भाषेचे व शब्दांचे मूल्य का म्हणून उणावून घ्यायचे? जिथे स्वकीय भाषेतील शब्द उपलब्ध आहेत तिथे ते योजायलाच हवेत. तिथे इंग्रजिचे किंवा उर्दू, फारसी सुद्धा अन्य कोणाही परकीय भाषेचे लाड नकोतच!मात्र जिथे शब्दांना प्रतिशब्द उपलब्ध नाहीत, तेथेही देववानी संस्कृतला शरण जात सोपे सुटसुटीत आणि अर्थवाही शब्द शोधणे आणि ते बोली भाषेत रुळविणे हे देखील आपले तितकेच महत्त्वाचे असे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मात्र माझे घोडे या मेयर शब्दाच्या तटावर अडले होते. पर्यायी शब्द सुचत नव्हता आणि मेयर म्हणून शुभेच्छा देणे मनाला पटत नव्हते. आता काहीच शब्द सूचणार नाही असे वाटत असतानाच एक शब्द स्फुरला, ‘महापौर’!! साधारण मोठ्या गावाच्या प्रमुखास मेयर म्हणतात अशा मोठ्या गावाच्या मागे पुर लावायची आपल्याकडे पद्धत आहे अगदी वैदिक काळापासून!!अशा पुरात राहणाऱ्या रहिवाशांना म्हणतात ‘पौरजन’ प्रथम नागरिक!! तुम्ही पुणे नामक पुराचे प्रमुख आहात ‘प्रथम नागरिक’ या अर्थी तुम्ही झालात महापौरजन त्याचेच सुटसुटीत रूप आहे “महापौर”!! असा अर्थपूर्ण शब्द सापडल्या सापडल्या ताबडतोब पत्र लिहावयास घेतले आणि धाडले सुद्धा!! तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! पत्र वाचत असताना गणपतरावांचे मन सावरकरांची अजोड तत्त्वनिष्ठा आणि साक्षात गृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता यांच्यासमोर नतमस्तक झाली भानावर हिताच गणपतराव धावत धावत कार्यालया बाहेर आले इकडे तिकडेही लक्ष न देता दारावर लावलेली पाटी उतरविण्याची खटपट करू लागले, शिपायाने त्यांना विचारले काय झालं साहेब त्यांनी सांगितलं ‘ तू लगेचच पळ आणि नवी पाटी बनवायला टाक ‘ अशीच नक्षी हवी अगदी!! केवळ त्याच्यावर दिलेल्या हवय
गणपतराव महादेव नलावडे, “महापौर”!! हो सावरकरांनी मराठी भाषेला अजून एक चिरंतन टिकणारी आणि सर्वमान्य होणारी देणगी दिली होती. आज एका शब्दाचा जन्म झाला होत.
( संकलित ) विद्या रानडे मुंबई