You are currently viewing शुभम बांदेकरची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड

शुभम बांदेकरची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड

शुभम बांदेकरची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड

शुभम बांदेकरची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड*

सावंतवाडी

येथील सुपुत्र शुभम विठ्ठल बांदेकर ची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.शुभमचे माध्यमिक शिक्षण मिलाग्रीज व उच्च माध्यमिक शिक्षण सैनिक स्कूल आंबोली येथे पूर्ण झाले त्यानंतर पुणे येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिक्षणाची पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले पणजी येथे भारतीय तटरक्षक दलाची पूर्व परीक्षेत विशेष गुणांनी उत्तीर्ण झाला.तदनंतर त्याची दिल्ली येथील हेडक्वार्टर मध्ये मुलाखत घेतली होती. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मार्फत राष्ट्रीय स्तरावर ही मुलाखत घेतली जाते.या परिक्षेत तो चौथ्या रॅंकने यशस्वी झाला
या नंतर केरळ येथील इंडियन नेव्हल अकॅडमी मध्ये त्यांने बावीस आठवड्याचे खडतर असे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
शुभमचे वडीलही सैन्यदलात होते.ते मूळचे मांगेली गावातील रहिवासी आहेत शुभम विद्यार्थीदशेत हुशार मुलगा म्हणून ओळखला जात असे.शांत स्वभाव मनमिळाऊ, जिद्द व चिकाटीने सातत्याने अभ्यास करून हे दैदिप्यमान कामगिरी केली आहे.पुढील महिन्यात केरळ येथील कोची येथे तो देश सेवेत रुजू होणार आहे.या त्यांच्या उत्तुंग भरारी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा