You are currently viewing कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वेंगुर्लेत भाजपाची प्रचार नियोजन बैठक संपन्न

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वेंगुर्लेत भाजपाची प्रचार नियोजन बैठक संपन्न

*आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील मतदारांचा आढावा घेतला*

 

वेंगुर्ले :

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर भाजपाची सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्याच्या प्रचार नियोजन बैठका घेण्यात आल्या.

वेंगुर्ले तालुक्याची बैठक भाजपा तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदवीधर निवडणूक जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे मान्यवर म्हणून उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी तालुक्यातील पदवीधर मतदारांचा आढावा सांगीतला, तसेच गावनिहाय पहील्या टप्प्यातील निवडणूक यंत्रणेची माहीती दिली.

यावेळी या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार निरंजन डावखरे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन करुन मतदारांपर्यंत चार टप्प्यात संपर्क करण्यासाठीची यंत्रणा उभी करण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपाचे कामगार नेते प्रकाश रेगे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तसेच मठ उपसरपंच बंटी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मा.नगराध्यक्ष राजन गिरप, तालुका संयोजक प्रशांत खानोलकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, महीला अध्यक्षा सुजाता पडवळ, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब,जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर – प्रणव वायंगणकर – समीर नाईक – हेमंत गावडे – नारायण कुंभार – प्रशांत बोवलेकर, मठ उपसरपंच बंटी गावडे, शिरोडा संयोजक मनोज उगवेकर, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर – गणेश गावडे – सुनिल चव्हाण, ता.चिटणीस समीर कुडाळकर व नितीन चव्हाण, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, महीला मोर्चाच्या प्राजक्ता पाटकर, भुषण सारंग, रफीक शेख, नगरसेवक प्रशांत आपटे, बुथ अध्यक्ष बाळु वस्त, प्रमोद वेर्णेकर इत्यादी उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले व आभार प्रदर्शन सुहास गवंडळकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा