You are currently viewing कुडाळ बाजारपेठ येथील पाटणकर कापडदुकानाच्या गोडावूनला आग..

कुडाळ बाजारपेठ येथील पाटणकर कापडदुकानाच्या गोडावूनला आग..

कुडाळ बाजारपेठ येथील पाटणकर कापडदुकानाच्या गोडावूनला आग..

कुडाळ.

कुडाळ बाजारपेठ येथील पाटणकर कापडदुकानाच्या गोडावूनला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले. यामध्ये त्यांचे कापडदुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. ही घटना सायंकाळी 5.30 वा घडली. कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र हाकेच्या अंतरावर असलेला कुडाळ नगरपंचायतीच्या बंब सुमारे एका तासाने घटनास्थळी दाखल झाला.

कुडाळ बाजारपेठ येथे ओटवणेकर तिठा येथे मुख्य बाजारपेठ येथे हे कापड दुकान आहे. शुक्रवार असल्याने हे दुकान बंद होते. दरम्यान सायंकाळी कुडाळ नगर पंचायतीच्या कामगारांना या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर धूर येताना दिसला. यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण केले. तो पर्यंत आग अधिकच भडकली. आगीच्या ज्वाला बाहेर येत होत्या. अर्धा तासात कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशमन दलाच्या बंब दाखल झाला व सुमारे एक तासात ही आग आटोक्यात आणण्यात आली. आतमध्ये दुकानातील काही किंमती साहित्य असल्याचे घटनास्थळावरून समजते. हे दुकान मुख्य बाजारपेठ येथे असून आग लवकर आटोक्यात आणता आल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. अन्यथा आग आजुबाजुला पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुडाळ नगरपंचायतीचा बंब अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. मात्र या बंबात काही तांत्रिक बिघाडामुळे तो चालु होऊ शकला नाही. त्यामुळे कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करावे लागले. यानंतर सुमारे एक तासानंतर हा बंब दाखल झाला. तोपर्यंत आग आटोक्यात आणली होती. यावेळी अन्य एका बंबाला पाचारण केले होते. तो बंब सुमारे दीड तासाने घटनास्थळी दाखल झाला. यावेळी बाजारपेठत मोठी गर्दी झाली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा