You are currently viewing पत्रादेवी चेकपोस्टवर दारुसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पत्रादेवी चेकपोस्टवर दारुसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पत्रादेवी चेकपोस्टवर दारुसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा

गोव्यातून आंध्रप्रदेश मध्ये होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या भरारी पथकाने कारवाई करत ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पत्रादेवी येथील अबकारी खात्याच्या तपासणी नाक्यावर करण्यात आली. नेहमी प्रमाणे काळोखाचा फायदा घेत चालक फरारी होण्यात यशस्वी झाला.

भरारी पथकाने ३० लाख रुपये किमतीची दारू व १२ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला. ही कारवाई निरीक्षक राजेश नाईक, जयेश बांदेकर, उपनिरीक्षक वासुदेव गवस, विशाल गवस, जितेंद्र गवस, लाडू गावकर, तुकाराम जंगले यांच्या पथकाने केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा