You are currently viewing कविता आणि मी

कविता आणि मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कविता आणि मी*

 

फुरसतीत बसले होते

सहजचि लिहिल्या चारच ओळी

प्रतिभेला पान्हा फुटला

अन् कविता तयार झाली

 

अपत्य माझे पहिले वहिले

आनंदाचे तरंग उठले

अरुणोदय जणु जीवनी झाला

लेखणीतुनी शब्द उमटले

 

सोबत आता कवितेची

शब्दांसंगे साथ सुरांची

सरीवर सरी या कशा बरसती

उधळण जीवनी आनंदाची

 

प्रिय सखी आहे माझी कविता

रस भक्तीचा अभंगातुनी

भावगीताचे प्रीतिभावही

शृंगार बरसतो लावणीतुनी

 

कवितेतुनी केली छंदोपासना

तयार त्या गझलांच्या रचना

प्रतिभेला येतो पूर कधीतरी

उसळत मनीच्या भाव भावना

 

अद्वैत जाहले कवितेशी

स्थान जीवनी मोलाचे

कवितेतुनी भगवंत भेटतो

सार्थक वाटे आयुष्याचे

 

अरूणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा