You are currently viewing गुरू माझा

गुरू माझा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुरू माझा*

 

स्वामी तिन्ही जगाचा

आई विना भिकारी

विद्या वाचस्पती गुरू विना

शिष्य जगी भिकारी

कसा कृपावंत

गुरू माझा…..

 

ज्ञानाचा सागर

बुद्धिचा जागर

जीवनाचा पथदर्शी

जगण्याचा मार्गदर्शक

गुरू माझा…..

 

आदर्शवत जीवन

सत्य शिकवण

सन्मार्गाचा दानी

भेदभाव नसे मनी

देई दिव्य ज्ञान

गुरू माझा…..

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर , धुळे.*

७५८८३१८५४३

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − six =