You are currently viewing कुडाळ येथील ३०० खाटांच्या महिला बाल रुग्णालयासाठी अद्याप निधीच नाही…

कुडाळ येथील ३०० खाटांच्या महिला बाल रुग्णालयासाठी अद्याप निधीच नाही…

 – अमित इब्रामपूरकर

पालकमंत्री उदय सामंत, आम. वैभव नाईक यांच्या नौटंकीचा पर्दाफाश मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे करणार असल्याचे केले स्पष्ट.

कुडाळ येथील महिला बाल रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी व रुग्णालयाचे उर्वरित काम पूर्ण करण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत,आम.वैभव नाईक यांनी राज्याच्या आरोग्य संचालीका अर्चना पाटील,राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अतिरिक्त संचालक डॉ.सतीश पवार या अधिकाऱ्यांना सूचना करत आहेत.

जिल्हयाच्या जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या ३०० खाटांच्या महिला बाल रुग्णालयाला गेली ६ वर्षे सत्तेतील लोकप्रतिनिधी १ कोटी निधी आणणार अशी घोषणा करत आहेत पण आजपर्यंत सदर रुग्णालयासाठी हे सत्तेतील लोकप्रतिनिधी निधी आणू शकले नाहीत.निधी वर्ग झाला नसताना संचालक दर्जाच्या अधिकार्‍यांना ३०० खाटांचे महिला बाल रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्याची पालकमंत्री उदय सामंत,आम. वैभव नाईक यांची नौटंकी का ?? असा सवाल मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे.
पत्रकात इब्रामपूरकर पुढे म्हणतात चिपी विमानतळही सुरु करु शकत नाहीत.विमान टेक आॕफच्या फक्त घोषणा करतात. मल्टीस्पेशालिटी हाॕस्पिटलच्या फसव्या घोषणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची कुडाळ येथील महिला बाल रुग्णालय सुरु करण्यासाठी होणारी दमछाक जनतेला दिसत आहे.

ऑगस्ट महिन्यात १ कोटीच्या निधीस आरोग्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.याबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.यामध्ये रुग्णालयाचे रंगकाम करण्यासाठी १५ लाख ७७ हजार,बाह्य पाणी पुरवठा ६ लाख ९० हजार, प्लॉट लेवलिंग व जोडरस्त्यासाठी ७ लाख ७ हजार , पार्टिशन,दरवाजे, किचन बेसिन, नळ आदिसाठी ६० लाख ६७ हजार, मिटरिंग की ऑस्क यासाठी ९ लाख ५० हजार अशा एकूण १ कोटीच्या कामांचा समावेश आहे.

प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर मंजूर निधी वर्ग करणे मंत्रालयात संबंधित खात्याच्या सचिव स्तरावरील प्रशासकीय बाब असते.आमदार वैभव नाईक यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेत निधी लवकरच वर्ग होणार अशी घोषणा केली होती म्हणजे आमदारांच्या मागणीला मंत्र्यांनी अद्याप पर्यंत केराची टोपली दाखवली आहे.

निधीच नसताना अधिकार्‍यांना महिला बाल रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्याची सुचना करणे ही नौटंकी पालकमंत्री उदय सामंत,आम.वैभव नाईक करत आहेत.अश्याप्रकारच्या अनेक नौटंकींचा पर्दाफाश मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मनसे करणार असल्याचेही अमित इब्रामपूरकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा