You are currently viewing तळेरे हायस्कूलचा दहावीचा निकाल १००%

तळेरे हायस्कूलचा दहावीचा निकाल १००%

स्नेहल तळेकर ८३.६०% गुणांसह विद्यालयात अव्वल

तळेरे :- प्रतिनिधी

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल तळेरे च्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातून सन २०२०-२१ च्या माध्यमिक शालांत परीक्षेत एकूण ४४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते . पैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा निकाल १००%लागला.
विद्यालयातील स्नेहल संतोष तळेकर हिने ८३.६०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. ७९.८० गुणांसह मिताली गोपाळ चव्हाण द्वितीय तर कशिश प्रणव पानवाला ७९.६०% गुणासह विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवला. विद्यालयातील ०५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीत १९ व द्वितीय श्रेणीत २० विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा निकाल १००% लागला
यशस्वी सर्व विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर ,शाळा समिती चेअरमन अरविंद महाडीक , दिलीप तळेकर , प्रविण वरूणकर, शरद वायंगणकर ,निलेश सोरप , सर्व कार्यकारी मंडळ , संस्था पदाधिकारी , मुख्याध्यापक संभाजी नलगे, शिक्षक-शिक्षकेतर वर्ग तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

फोटो:-१७/७/२०२१
१.कु.स्नेहल तळेकर
२.कु. मिताली चव्हाण
३.कु.कशिश पुनावाला

प्रतिक्रिया व्यक्त करा