कणकवली नगरपंचायतीकडून 25 किलो प्लास्टिक जप्त…
कणकवली
कणकवली नगरपंचायतीच्या प्लास्टीकबंदी पथकातर्फे नुकतेच शहरामध्ये ‘सिंगल युज’ प्लास्टिक व सबंधित वस्तू बाळगाऱ्या व्यवसायिकांविरोधात कारवाईसत्र राबविण्यात आले. प्रभारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 25 किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. तसेच सहा जणांविरोधात मिळून 21 हजार 900 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाची अधिसूचना, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम अधिनियमानुसार ही करवाई करण्यात आली. यावेळी व्यापारी, नागरिकांनी कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले. कारवाई पथकामध्ये न. पं. पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सोनाली खैरे, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, कर्मचारी ध्वजा उचले, शहर समन्वयक वर्षा कांबळे, आरोग्य लिपिक सतीश कांबळे, प्रवीण गायकवाड, रवींद्र म्हाडेश्वर, सचिन तांबे, संजय राणे, राजेश राणे, विनोद जाधव आदी सहभागी झाले होते.