You are currently viewing जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा झाराप नं.१ च्या सुशोभिकरणाच्या मदतीसाठी दशावतारी नाटकाचे आयोजन

जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा झाराप नं.१ च्या सुशोभिकरणाच्या मदतीसाठी दशावतारी नाटकाचे आयोजन

*ओंकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळाने सादर केला नाट्यप्रयोग*

झाराप :

 

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झाराप नं १ च्या सुशोभिकरण्याच्या मदतीसाठी ओमकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळ मालक अजित पित्रे यांचं नाटक सादर करण्यात आले. याचे औचित्य साधून बदली झालेल्या शिक्षिका सौ. अस्मिता तेर्से, सौ. अमिता सामंत आणि सौ. स्नेहा सावंत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी झाराप ग्रामपंचायत सरपंच, इतर सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सभासद उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुंबई ग्रामस्थ मंडळाचे सदस्य श्री.कमलाकर माणगावकर यांची देखील कार्यक्रमास उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि शाळेच्या सुशोभीकरणासाठी मदत देण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा