You are currently viewing माझ्या वडिलांमुळेच मला ‘पद्मश्री’…

माझ्या वडिलांमुळेच मला ‘पद्मश्री’…

‘रंगबहार’ च्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न..

कुडाळ
वडिलांची भूमिका हि कोणाच्याही आयुष्यात महत्वाची असते. माझे वडील विश्राम गंगावणे यांनी माझ्यावर ठाकर कला संवर्धनाची जबाबदारी लहान वयातच सोपविली. त्यामुळेच मला या कलेसाठीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला, असे भावपूर्ण उद्गार ठाकर लोकककलाकार आणि अलीकडेच ज्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला ते परशुराम गंगावणे यांनी काढले. येथील “रंगबहार” आयोजित कै.मंदार रमण कुलकर्णी स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

रंगबहार कुडाळ या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने कै. मंदार रमण कुलकर्णी स्मृती महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा कोव्हीड विषयक सर्व नियम पाळून कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात संपन्न झाला. या सोहळयाचे उदघाटन भगीरथ संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली होते. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे, सावंतवाडीच्या डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळंके, परीक्षक सौ. शिल्पा निगुडकर, चेतन गंगावणे, रंगबहार संस्था प्रतिनिधी माजी सरपंच प्रशांत राणे उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. रोख रक्कम, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प असं या बक्षिसाचे स्वरूप होते. स्पर्धेतील विजेते शुभम अजित पाटील, हर्षदा अनंत कुडव, उषा विरेन्द्र पवार, सुजय सत्यवान जाधव आणि सुविता अशोक नेरुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून रंगबहार संस्थेने आयोजित केलेल्या या निबंध स्पर्धेमुळे वडिलांबद्दल व्यक्त होता आल्याने संस्थेचे आभार मानले..

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 1 =