You are currently viewing मराठमोळ्या रहाणेचा बहुमान, मानाचं Johnny Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू…

मराठमोळ्या रहाणेचा बहुमान, मानाचं Johnny Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू…

भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या कसोटीत झालेला दारुण पराभव विसरत ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं. कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

 

या शतकी खेळीसाठी अजिंक्यला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यानिमीत्ताने त्याला मानाचं Johnny Mullagh Medal देण्यात आलं. २०१९ साली क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीत सामनावीराचा पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूला माजी क्रिकेटपटू Johnny Mullagh यांच्या सन्मानार्थ मेडल देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला. यानंतर मराठमोळ्या अजिंक्यने हे मानाचं मेडल पटकावत भारताचं नाव मोठं केलं आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =