You are currently viewing राणेंना मतदान करा सांगत पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग!

राणेंना मतदान करा सांगत पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग!

राणेंना मतदान करा सांगत पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग!

माजी आमदार परशुराम उपरकर यांची देशाच्या निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

रत्नागिरी –

सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण तातू राणे यांनी केले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन म्हणजे मतदारांना लाच देणे, मतदारांना धमकावणे इ. आम्हांला मिळालेल्या व्हिडीओ पुराव्यानुसार ते तुम्हाला फॉरवर्ड करत आहे. त्यावरून असे दिसून येते की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते श्री. जाधव खुलेआम पैसे देत आहेत. अशी तक्रार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार भारत निवडणूक आयोग निर्वचन सदन, यांच्याकडे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण तातू राणे आणि ईव्हीएम मशिनवर कोणत्या चिन्हावर मतदान करायचे तेही दाखवले. व्हिडीओ पुरावा गाव – फोंडा, तालुका – कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग येथील आहे. व्हिडिओनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया ही तक्रार स्वीकारा आणि उमेदवार आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी उपरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यांच्याकडे केली आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

प्रतिक्रिया व्यक्त करा