भव्य नाट्यगीत गायन स्पर्धेत गोव्याची हर्षा गणपुले प्रथम
आरवली
श्री देव वेतोबा पुन: प्रतिष्ठा वर्धापन निमित्त (सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा आणि बेळगांव मर्यादित) भव्य नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन दिनांक ८ मे २०२४ रोजी करण्यात आले होते, या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु हर्षा गणपुले (गोवा) हिने प्राप्त केला व रोख रुपये ११,१११/- रु. व सन्मानचिन्हाची मानकरी ठरली, व्दितीय क्रमांक रोख रू ७,७७७/- व सन्माचिन्ह कु. अर्णव बुवा (गडहिंग्लज), तृतीय क्रमांक ५,५५५/- व सन्मानचिन्ह कु. हर्ष नकाशे (कणकवली) तर उत्तेजनार्थ क्रमांक प्रत्येकी रोख रू २,२२२/- व सन्मानचिन्ह दत्तगुरु केळकर (गोवा), स्वरदा पणशीकर(आरवली), रसिका हिडदुग्गी (गडहिंग्लज) यांनी प्राप्त केला.
या स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, सिंधुदूर्ग रत्नागिरी,कोल्हापूर, गोवा व बेळगांव येथील एकूण २८ स्पर्धकांची निवड अंतिम फेरी करिता करण्यात आली.
या स्पर्धेचे परीक्षण रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक- नट रंगकर्मी श्री रविंद्र घांगुर्डे व डॉ. सौ वंदना घांगुर्डे (पुणे) यांनी केले. स्पर्धेस संगीत साथ पं. लालजी देसाई संगीत विद्यालय आरवली चे संचालक श्री निलेश मेस्त्री (ऑर्गन), मंगेश मेस्त्री (हार्मोनियम) व श्री किशोर सावंत आणि कु. निरज मिलिंद भोसले यांनी तबला साथ केली तर संपुर्ण स्पर्धेचे निवेदन श्री संजय कात्रे यांनी केले व ध्वनि व्यवस्था श्री समीर आरोसकर यांनी सांभाळली.
तर संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बाळा राय, श्रीकांत जोशी, भालचंद्र दिक्षित, निलेश मेस्त्री, भास्कर मेस्त्री, शेखर पणशीकर, प्रसाद जोशी, रमण शेल्टे, श्रीपाद कामत, शेणई गुरुजी, आबा टाक्कर , डॉ. प्रसाद साळगावकर, विद्याधर (बाळू) कांबळी, निरज भोसले, गोविंद मळगावकर यांनी मेहनत घेतली, स्पर्धेस रसिकांचा अभुतपूर्व प्रतिसाद लाभला.