You are currently viewing बांद्यात मुलींना अश्लील संदेश पाठवणाऱ्या परप्रांतीयाला  ग्रामस्थांकडून चोप

बांद्यात मुलींना अश्लील संदेश पाठवणाऱ्या परप्रांतीयाला  ग्रामस्थांकडून चोप

बांद्यात मुलींना अश्लील संदेश पाठवणाऱ्या परप्रांतीयाला  ग्रामस्थांकडून चोप

बांदा

शहरातील काही मुलींना अश्लील संदेश पाठविणे परप्रांतीय तरुणाच्या आंगलट आले. हा प्रकार उघड झाल्यानंतर पालकांसह स्थानिकांनी त्या तरुणाला रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला. मात्र याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २० वर्षीय परप्रांतीय तरुण शहरातील काही तरुणींना प्रसार माध्यमातील विविध प्लॅटफॉर्मवरून अश्लील संदेश पाठवत होता. काही मुलींना लग्नासाठी मागणी घालत होता तर काहींना फिरायला जाण्यासाठी आग्रह करत होता. याबाबतची कल्पना काही मुलींनी आपल्या पालकांना दिली. दरम्यान काल सकाळी पालकांनी सापळा रचत या तरुणाला संदेश पाठविताना रंगेहात पकडले. यावेळी तरुणाला जाब विचारण्यात आला, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने स्थानिकांनी त्याचा बेदम चोप काढला. तसेच मोबाईल मधील सर्व मुलींचे मोबाईल नंबर डिलीट करण्यास सांगितले. याबाबत बांदा पोलिसात तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा