You are currently viewing बारामतीत ईव्हीएम EVM मशिन ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

बारामतीत ईव्हीएम EVM मशिन ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

‌बारामतीत ईव्हीएम EVM मशिन ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

शरद पवार गटाकडून तक्रार दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडले. दरम्यान मतदान झाल्यानंतर मतदारसंघात ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे आज सकाळपासून बंद पडल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने केला आहे.

तसेच त्यांनी याबाबतची तक्रारही दाखल केली आहे.

सुप्रिया सुळे यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगा तक्रार केली होती. तक्रारीनंतर तब्बल 45 मिनिटे बंद झालेले सीसीटीव्ही पुन्हा सुरू झाले आहेत.

दरम्यान बारामती मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान झाले होते. तर याची मतमोजणी 4 जूनला होणार आहे. तोपर्यंत या ईव्हीएम मशिन्स बारामतीतील विधानसभा मतदारसंघ गोदामात म्हणजेच स्ट्रॉगरूममध्ये ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान आज सकाळी राष्ट्रवादीचे (शरद पवार) लक्ष्मीकांत खाबिया यांना ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी काहीतरी काळंबेरं होण्याची शक्यता वर्तवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत आयोगाकडून हे कॅमेरे सुरू करण्यात आले.

 सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, “बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशिन्स ज्या गोदामात ठेवलेले आहे त्या गोदामाचे सीसीटीव्ही सकाळी 10:25 पासून 45 मिनिटांपासून बंद आहेत. त्यामुळे यामध्ये काही काळं बेरं तर नाही ना याची शंका येत आहे.

ते पुढे म्हणाले, “आम्ही आधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधत आहोत. बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी टेक्निशियन्स उपलब्ध नाहीत. गोदामाबाहेर असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना गोदामात काय चाललेय हे पाहू देत नाहीत. पोलीस म्हणत आहेत, आम्हाला काही आदेश नाहीत. त्यामुळे येथे काय चाललेय कळेना झाले आहे.”

प्रतिक्रिया व्यक्त करा