You are currently viewing ५३ वर्ष दशावतार कलेचा अभ्यास करत कर्नाटक उडपी येथील यक्षगान अभ्यासले – विजयकुमार फातर्पेकर

५३ वर्ष दशावतार कलेचा अभ्यास करत कर्नाटक उडपी येथील यक्षगान अभ्यासले – विजयकुमार फातर्पेकर

५३ वर्ष दशावतार कलेचा अभ्यास करत कर्नाटक उडपी येथील यक्षगान अभ्यासले – विजयकुमार फातर्पेकर

सावंतवाडीत यक्षगान नाट्यप्रयोगाचे मराठीतून सादरीकरण…

सावंतवाडी

गेली ५३ वर्ष दशावतार कलेचा अभ्यास करत असताना कर्नाटक उडपी येथील यक्षगान अभ्यासले दशावतारी कलेवर आकर्षित होऊन त्याचा अभ्यास करत या पुस्तकाचे लेखन केले, असे मत प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रकाशन पुणे यांच्या माध्यमातून प्रा. विजयकुमार फातर्फेकर लिखित दशावतार कला आणि अभ्यास या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम  येथील संस्थानकालीन राजवाडा परिसरात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

संस्थांचे राजे खेमसावंत भोसले, राणी शुभदादेवी भोसले यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त कर्नाटक उडपी येथील यक्षगान या नाट्यप्रयोगाचे मराठीतून सादरीकरण करण्यात आले. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नाट्यप्रेमी उपस्थित होते.

याप्रसंगी नाटककार व लेखक प्रा. विजयकुमार फातर्पेकर, यक्षगान केंद्राचे संस्थापक संजीव सुवर्ण, अभिषेक जाखडे, डी.टी. देसाई, श्री.सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्राचार्य डी. एल.भारमल, सीमा मराठे, प्रा. पद्मा फातर्पेकर, ॲड. नकुल पार्सेकर आदी उपस्थित होते.

श्री. फातर्पेकर म्हणाले की, गेली ५३ वर्ष दशावतार कलेचा अभ्यास करत असताना कर्नाटक उडपी येथील यक्षगान अभ्यासले दशावतारी कलेवर आकर्षित होऊन त्याचा अभ्यास करत या पुस्तकाचे लेखन केले आहे. यक्षगान अभ्यास करताना माहिती गोळा केली ती दशावतार कलेसाठी देखील उपयोगी ठरली. दशावतार आणि यक्षगान या लोककला स्वतंत्र असल्या तरी त्या लोकांना भावतात असे ते म्हणाले.

दरम्यान, यानंतर कर्नाटकी कलावंतांकडून यक्षगानचा प्रयोग मराठीतून सादर करण्यात आला. कर्नाटकातील उडपी येथील यक्ष संजीव यक्षगान केंद्राचे प्रमुख आचार्य व संस्थापक संचालक गुरु संजीव सुवर्णा आणि त्यांचे शिष्यगण यांनी हा प्रयोग सादर केला, याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

प्रतिक्रिया व्यक्त करा