You are currently viewing ‘या’ महिन्याच्या अखेरीस कोसळणार ठाकरे सरकार!!

‘या’ महिन्याच्या अखेरीस कोसळणार ठाकरे सरकार!!

सिंधुदुर्ग :

एकीकडे ईडीने शिवसेनेच्या नेत्यांना नोटीस बजावल्यामुळे राज्यातील राजकारण तापले असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार पाडण्याचा मुहूर्त शोधून काढला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हे सरकार दिसणार नाही, असा परखड दावाच राणेंनी केला आहे.

सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत असताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडेतोड टीका केली. ‘पालकमंत्री आणि खासदार यांचं काहीही ऐकू नका, सध्या ते तात्पुरते आहे. लवकरच ते लांब रजेवर जाणार आहे. मार्चनंतर ठाकरे सरकार हे दिसणार नाही’, अशी भविष्यवाणीच राणे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 11 =