You are currently viewing बिट्टी आणि तिचे बाबा !

बिट्टी आणि तिचे बाबा !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बिट्टी आणि तिचे बाबा !*

 

बिट्टी बेटा ! स्वप्न बघणं सोडू नकोस

अग!स्वप्न संपलं की सारं काही संपल अग!परी,राक्षस,जादू सारं

काही खरं असतं , तुझ्या माझ्या

सारखं सगळ काही खरं असतं..

 

चेटकीण शाप देईल या भीतीने

बाबा तिला थोपटत झोपवायचा

नकला करत पाठीवर बसवून

फिरवायचा,तीन चाकीवरून तिला

जग दाखवायचा..

 

बाबा आणि बिट्टी-बिट्टीआणिबाबा

दोघे एकमेकांच्या मीठीतच जगायचे

बिट्टी चा बाबा लाख मोलाचा

नशेत धुत नसेल तर फार गुणांचा

 

दारूत त्याने सारं काही गमावलं

व्यवसाय,सुंदर घर,सोशिक बायको

सारं जवळच दारून उध्वस्त केले

सगळ्यांनी त्याला वाळीत टाकले

 

बिट्टीचं प्रेम त्याला जगवत होतं

कर्जबाजारी बाबाला जग दारुड्या

म्हणूनच ओळखत होतं

अभावातही भाव जपणारा बाबा

बिट्टीच्या भावविश्वाचा नायक होता

 

बिट्टी तुला पुढे काय व्हायचं

डाॅक्टर,इंजिनिअर,आर्किटेक्,वकील

बिट्टी बाबाच्या गळ्यांत हात टाकून

बाबाला म्हणाली “बाबा मला अगदी

तुमच्या सारखचं व्हायचं ”

तिला मिठीत घेवून बाबा ढसाढसा

रडला आजारी बाबा अंथरुणावर

खिळला ….

 

बिट्टी बाबा सोबतच असायची

त्याची करमणूक करत शाळेतील

कविता गाऊन दाखवायची

बाबा तिची बडबड,गाणी,ऐकत

निपचित पडून राहायचा

बिट्टी माझं औषध आईने लपविले

आणून देतेस कां?

पुन्हा नाही तुला सांगणार

बिट्टीने गुपचुप औषध आणून दिले

बाबाने आपल्या परीचा मुका घेतला

त्या रात्री बिट्टीचा बाबा गेला

 

आज बिट्टी मोठी झाली

सुंदर सुंदर कविता करते

बाबा सारखीच दिसते

तिच्या कवितेत बाबा तिचे

हिरो आहेत

बिट्टी करता बाबा आजही

जिवंत आहेत

 

बाबा ठाकूर धन्यवाद

माझ्या गुलकंद या संग्रहातून

बिट्टी आज Joint Secretary

आहे सचिवालयात..!

प्रतिक्रिया व्यक्त करा