You are currently viewing श्री गणेशपूजा प्रशिक्षण नि:शुल्क वर्ग

श्री गणेशपूजा प्रशिक्षण नि:शुल्क वर्ग

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थीला, श्री गणेश पूजन कसे करावे ह्याचे प्रशिक्षण आणि पूर्वी शिकलेल्यांसाठी उजळणी वर्ग १२ मे २०२४ पासून, दरवर्षीप्रमाणे, दर रविवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत, वनमाळी हॉल, छबिलदास रोड, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८ येथे होतील. सदर वर्ग नि:शुल्क आहेत. सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग आणि वयाच्या व्यक्तींना मुक्त प्रवेश आहे. प्रत्येकास १२ मे पासून श्रावण महिना संपेपर्यंत दर रविवारी हजर राहायचे आहे. नोंदणी आवश्यक नाही. इच्छुकांनी थेट वनमाळी हॉल येथे वही आणि पेन घेऊन हजर राहावे. अधिक माहितीसाठी प्रमोद नाईक ९९२००६६५७५ यांच्याशी संपर्क साधा.

प्रतिक्रिया व्यक्त करा