You are currently viewing रहाटेश्वर येथील माळावर आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान

रहाटेश्वर येथील माळावर आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान

देवगड

देवगड तालुक्यात आगीमुळे नुकसान होण्याची तिसरी घटना घडली असून रहाटेश्वर येथील माळावर आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये 35 ते 50 एकर क्षेत्र जळुन गेले आहे. तसेच शौकत युनुस शेख यांचे कलम बागेला आग लागली व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तसचे वसंत टुकरुल यांची बागेतील काही कलमाचे नुकसान झाले आहे. गवत जळुन गेले आहे. त्यामुळे बागायतदारांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सलग तीन वर्षे ही आग लागत आहे. या लागणार-या आगींचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांपुढे आहे.  पडवणे येथील झालेल्या अग्निकांडात शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. यापाठोपाठ रहाटेश्वर येथेही असाच प्रकार झाल्याचे समोर येत आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + nineteen =