You are currently viewing गोवा बनावटीच्या दारुसह ७ लाखाची आलिशान कार जप्त ; कणकवली पोलिसांची कामगिरी

गोवा बनावटीच्या दारुसह ७ लाखाची आलिशान कार जप्त ; कणकवली पोलिसांची कामगिरी

गोवा बनावटीच्या दारुसह ७ लाखाची आलिशान कार जप्त ; कणकवली पोलिसांची कामगिरी

कणकवली :

लोकसभा निवडणुकी धामधूम सुरू असताना कणकवलीत जाणवली येथील हॉटेल निलम कंट्रीसाईड जवळ कणकवली पोलिसांनी एका आलिशान कार ( एमएच ०७ एजी ९६४८ ) वर छापा टाकला.

सदर कार मध्ये ६३ हजार ३६० रुपयांच्या गोवा बनावटीच्या अवैध दारुसह ७ लाखाची आलिशान कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ५ मे २०२४ रोजी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी दत्तप्रसाद नंदकुमार जोईल ( रा. तळेबाजार ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल राहुल राऊत यांनी दिली. त्यानुसार आरोपी दत्तकुमार जोईल विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ( a ), ६५ (e ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई कणकवली पोलिसांनी केली. तर या कारवाईत कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, हवालदार मिलिंद देसाई, पोलीस नाईक विनोद चव्हाण, महिला पोलीस विनया सावंत, चालक मकरंद माने सहभागी होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा