You are currently viewing बेपत्ता युवतीचा मृतदेह ओझरम तलावात आढळला

बेपत्ता युवतीचा मृतदेह ओझरम तलावात आढळला

बेपत्ता युवतीचा मृतदेह ओझरम तलावात आढळला…!

आत्महत्या की घातपात? कारण मात्र अस्पष्ट…!

कणकवली :

17 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली ज्योती अंकुश मेस्त्री (16, रा. ओझरम-माळवाडी) या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ओझरम तलावात आढळून आला. याप्रकरणी तिच्या अपहरणाचा गुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र तिने आत्महत्या केली की अन्य काही कारण हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही.

सोमवारी सकाळी तलावाचे वॉचमन चंद्रकांत पडवळ हे नेहमीप्रमाणे ओझरम तलावाची पाहणी करून पाण्याची पातळी मोजण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तलावात सफेद रंगाचा कुर्ता व आकाशी रंगाचा पायजमा घातलेला स्त्री जातीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यानंतर श्री. पडवळ यांनी याबाबतची माहिती ओझरम सरपंच, उपसरपंच व पोलिस पाटील यांना दिली. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तलावातील तो मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह कणकवली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीच्या शरीरावरील कपडे व त्या मृतदेहाच्या शरीरावर असलेले कपडे यात साम्य आढळले. त्यानंतर ओझरम तलावात मृतदेह आढळल्याची माहिती त्या मुलीच्या भावाला दिली. त्या मुलीचा भाऊ आकाश मेस्त्री हा घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी केली असता तो मृतदेह ज्योती मेस्त्री हिचा असल्याचे सांगितले. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =