You are currently viewing मनसेच्या HRCT दरा सबंधी आंदोलनाच्या घेतलेल्या भूमिकेला यश

मनसेच्या HRCT दरा सबंधी आंदोलनाच्या घेतलेल्या भूमिकेला यश

जिल्हाध्यक्ष धीरज परब

मनसे शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक आणि शल्यचिकित्सक यांची भेट घेवुन खाजगी सिटीस्कॅन सेंटर मध्ये HRCT टेस्ट करिता . अवाजवी दर आकारले जात असल्या बाबत निवेदन दिले होते. निवेदनात चार दिवसात कारवाई व्हावी व शासनमान्य दर लागु व्हावे असा उल्लेख होता. HRCT टेस्ट करीता 5500 ते 7000 पर्यंत दर खाजगी लॅब आकारात होते…
या भेटीच्या दुसर्या दिवशी मिडीयातील बातमीची दखल घेवुन पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी 3000 ज्या वर जे सेंटर दर आकारेल त्यावर कारवाई चे आदेश दिले होते. मनसे कार्यकर्त्याच्या माध्यमातून कमी दराबाबत जनजागृती करण्यात आली होती.
आणि काल तिसऱ्या दिवसा पासुन सिटीस्कॅन सेंटर ने कमी दरा बाबत पत्र मनसेला दिले या पत्रात शासन मान्य दर लागु करत असल्याचा उल्लेख आहे.
2500/3000 दर सध्या केले व दर पत्रक बाहेर लावले. मनसेच्या चार दिवसाच्या अल्टीमेटम च्या आधीच सामान्य जनतेला या तुन दिलासा मिळाला आहे . मनसेने घेतलेल्या आंदोलनाच्या भुमिकेचा सार्थक झाल्याचे धीरज परब यांनी मिडीयाशी बोलताना सांगितले…
शासनाचा आदेश असताना हा सावळा गोंधळ घालुन जनतेला खर्चात घालणार्या पालकमंत्री व आमदारांचे हे अपयश आहे. ओरोस अॅब्युलन्स प्रकरण असुदे. मनसे पदाधिकारी सतर्कतेने जनतेचा आवाज बनत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =