You are currently viewing तारखेवरून नेत्यांचा वाद; उद्घाटनानंतर पहिल्या विमानात मी नक्की असेनच…

तारखेवरून नेत्यांचा वाद; उद्घाटनानंतर पहिल्या विमानात मी नक्की असेनच…

सावंतवाडी :

‘चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख अद्याप ठरली नाही. त्यामुळे 26 तारीख ही कोणी ठरवली हे मला माहीत नाही. त्यामुळे उद्घाटनाला कोण येणार हे कसे निश्चित होणार,’ असा सवाल राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘उद्घाटनानंतर पहिल्या विमान उड्डाणात पालकमंत्री म्हणून मी असेनच पण अन्य कोण असतील मला माहीत नाही,’ असा टोला ही मंत्री सामंत यानी राणे यांचे नाव न घेता लगावला. यावेळी सहसंर्पक प्रमूख शैलेश परब तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, बाबू कुडतरकर आदि उपस्थीत होते.

मंत्री सामंत म्हणाले, कोरोना टू आल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही रिस्क नको म्हणून अद्याप पर्यंत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय आपण घेतलेला नाही याबाबत आपत्कालीन यंत्रणेशी योग्य ती चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. चिपी विमानतळ होणे हा सांघिक प्रयत्न आहे त्यामुळे उद्घाटनाला सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जाईल, हा नको तो नको अशी कोणतीही भूमिका घेतली जाणार नाही. हे काम सांघिक आहे त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन उद्घाटन केले जाईल. मात्र उद्घाटनासाठी 26 जानेवारीचा मुहूर्त कोणी काढला हे मात्र माहीत नाही, असे ही त्यांनी सांगितले

मंत्री सामंत म्हणाले, कोरोना टू येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्याबाबत अद्यापपर्यंत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. मुलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यापासून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =