You are currently viewing 5 जानेवारीपर्यंत रात्रीच्या संचारबंदीचे आदेश लागू..

5 जानेवारीपर्यंत रात्रीच्या संचारबंदीचे आदेश लागू..

पुणे –

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात दि. 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. त्यासह आता जमावबंदीदेखील लागू झाली आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले.

संचारबंदीचे आदेश असतानाही शहरात ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती. तर, नववर्ष स्वागतासाठी गुरुवारी (दि. 31) शहरात वेगवेगळ्या भागांत गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, दिवसा सर्व व्यवहार सुरळीत राहतील. एखाद्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत हवी असल्यास त्याने वैद्यकीय कागदपत्रे जवळ ठेवावीत.

पोलिसांकडून त्यांची अडवणूक होणार नाही. शहरात दि. 5 जानेवारीपर्यंत रात्रीच्या संचारबंदीचे आदेश लागू आहेत. या काळात नागरिकांनी रात्रीचा प्रवास टाळावा. बाहेरगावाहून येणाऱ्यांनी प्रवासाचे नियोजन करून सायंकाळपर्यंत इच्छितस्थळी पोहचावे, असे डॉ. शिसवे यांनी म्हटले आहे.

संचारबंदी आदेशात अंशतः: बदल करण्यात आले असून, रात्री जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत. या आदेशांचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. मात्र, वैद्यकीय सेवेत कोणताही अडथळा निर्माण केला जाणार नाही.

– डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 19 =