You are currently viewing बुराणगल्ली बाहेरचा वाडा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

बुराणगल्ली बाहेरचा वाडा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरातील बुराणगल्ली बाहेरचा वाडा या भागातील रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा आचारसंहितेनंतर या भागातील नागरिकांसह आंदोलनाचा इशारा झरीना शेख यांनी दिला आहे याबाबतचे लेखी निवेदन नागरिकांच्या वतीने देण्यात आले होते व महाराष्ट्र दिन एक मे रोजी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला असून लवकरच हा रस्ता या रस्त्याचे दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र या आश्वासनाची पूर्तता त्या पद्धतीने झाल्याने पावसाळापूर्वी हा रस्ता दुरुस्त न केल्यास नागरिकांच्या वतीने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान शहरातील अत्यंत तीव्र उतार असलेला ह्या रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. रफिक गवंडी बांध्या घराजवळून जाणाऱ्या म्हाडाच्या इमारतीच्या कामासाठी अवजड वाहने या रस्त्यावरून ये जा करत असल्याने दुचाकी तीन चाकी वाहने चालवणे जिकरीचे झाले आहे त्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी मागणी नागरिकांनी २८ सह्यांच्या निवेदनाद्वारे सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना सादर केले आहे. यात अफरोज शेख, शबीना शेख, मोहंमद, सुलेमान, अंजली कुडतरकर, बशीर गवोंडी, रुबिना गवोंडी , नागेश कुडतरकर यांच्यासह २८ कुटुंबांच्या स्वाक्षऱ्या आहेत

मात्र हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असून या रस्त्याची पाहणी बांधकाम विभागातील अभियंता यांच्या कडून करण्यात येऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. सदरचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी च्या प्रस्तावा संदर्भात दि. २९ एप्रिल २०२४ ला सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. सदरच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेऊन निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या कामी निधी उपलब्ध झाल्या नंतर विहित प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येणार आहे. असे आश्वासन सावंतवाडी नगर परिषदेत च्या वतीने लेखी पत्राद्वारे देण्यात आले होते त्यामुळे एक मे रोजी होणारे उपोषण आंदोलन नागरिकांनी स्थगित केले होते.

बुराम गल्ली बाहेरचा वाडा, या नागरिकांकडून मागील अनेक वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त न केल्यास आणि या रस्त्यावर अपघात झाल्यास याची सर्व जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

यासाठी वेळोवेळी नगरपरिषदेकडे मागणी अर्ज, निवेदने, तोंडी विनंत्या करून हि प्रशासनाच्या कोणत्याही विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे पावसापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा