You are currently viewing आमदार नितेश राणे यांची राष्ट्रीय समाज पक्ष प्रमुख पदाधिकारी यांनी घेतली कणकवली येथील निवासस्थानी भेट

आमदार नितेश राणे यांची राष्ट्रीय समाज पक्ष प्रमुख पदाधिकारी यांनी घेतली कणकवली येथील निवासस्थानी भेट

*आमदार नितेश राणे यांची राष्ट्रीय समाज पक्ष प्रमुख पदाधिकारी यांनी घेतली कणकवली येथील निवासस्थानी भेट*

*युतीधर्म पाळत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये रासप पक्ष करणार महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार*

*नवलराज विजयसिंह काळे भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी यांनी घडून आणली भेट*

यावेळी रासप पक्षाचे पदाधिकारी सिमंतिनी मयेकर – कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्षा,सुशांत पोवार-कोकण विभाग प्रसिद्धी प्रमुख,उज्वला येळावीकर- सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा
युवराज खराडे -सिंधुदुर्ग विधानसभा अध्यक्ष व तन्मय राणे जिल्हा कार्यकारी सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात महायुतीने राष्ट्रीय समाजपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवार देऊन आमच्या पक्षाचा सन्मान केला त्याबद्दल महायुतीचे सर्व नेत्यांचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आभार मानले कोकणच्या सर्वांगीण विकास आदरणीय नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातूनच झाला आहे आणि त्यांनीच या कोकणाला सावरले आहे त्यामुळे युती धर्म पाळत आम्ही सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी राणेसाहेबांचा ग्राउंड लेव्हलला जाऊन प्रचार करणार व त्यांच्या मताधिक्यामध्ये खारीचा वाटा देण्यासाठी रासपपक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये प्रयत्न करेल असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांना दिला. आमदार नितेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील तुम्ही आमच्या संपर्कात कायमस्वरूपी रहा निवडणुकीपुरती संपर्कात न राहता इतर वेळी सुद्धा आपण आमच्या संपर्कात राहिला तर आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या समाज बांधवांना निधी स्वरूपात मदत करून देखील विकसित सिंधुदुर्ग रत्नागिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहो आपल्याला बळ देण्याचे काम देखील आमच्या माध्यमातून होईल आपण एकदिलाने काम करावं आणि तुम्ही ते कराल असं विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. नवलराज काळे यांच्या माध्यमातून समाजाचे बरेचसे प्रश्न मार्गी लावले असून पुढील येणाऱ्या काळामध्ये तुम्हा सर्वांना एकत्र करून तुमच्या सर्व प्रश्नांवरती लक्ष देऊ असा शब्द नितेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा