You are currently viewing कोलगाव येथे ट्रकची शिवशाहीला धडक

कोलगाव येथे ट्रकची शिवशाहीला धडक

सावंतवाडी

सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरुन ठोकर दिल्याने कोलगाव येथे शिवशाही बसला अपघात झाला आहे. यात ८ प्रवासी आणि दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले आहेत.

हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आंधळ्याचा चढाव येथे सावंतवाडी-कुडाळ मार्गावर घडला. दरम्यान जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा