You are currently viewing अखेर चर्चांना मिळाला पूर्णविराम !

अखेर चर्चांना मिळाला पूर्णविराम !

विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची मुंबईत बदली, तर दीपक पांडे नाशिकचे नवे पोलिस आयुक्त

मुंबई / प्रतिनिधी :-

राज्यातील गणेशोत्सवानंतर गृहविभागाकडून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याच्या काही दिवसांपासून चर्चा होत होत्या. त्या बदल्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दिपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे.

कोल्हापूर महानिरीक्षक पदाची जबाबदारी मनोजकुमार लोहिया यांच्याकडे देण्यात आली असून, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून प्रताप दिघावकर यांची नियुक्ती झाली आहे. तसेच नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी
पोलिसदलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) म्हणून विनय कुमार चौबे यांची नियुक्ती झाली आहे. तर पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना तेथेच ठेवण्यात आले असून या दोन प्रमुख शहरात नवे पोलिस आयुक्त येणार नाही. पिंपरी – चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नेमणूक झाली आहे.

एकूण 45 जणांच्या बदलांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी
नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बिपिन कुमार सिंह यांची नियुक्ती केली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरती सिंह यांची नियुक्ती केली आहे, तर मुंबईच्या गुन्हेशाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. अश्या एकूण ४५ जणांच्या बदल्यांच्या आदेशांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =