जिल्ह्यातील 4 पोलीस अधिकारी व 7 पोलीस अंमलदार यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र पोलीस विभागात पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवा केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सन 2023 या वर्षाकरीता सिंधुदुर्ग पोलीस दलातील वेंगुर्ला पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्ष संदीप अशोक भोसले, सावंतवाडी पोलीस ठाणे येथील तानाजी महादेव नारनवर, पोलीस मुख्यालय येथील राखीव पोलीस निरीक्षक रामदास नागेश पालशेतकर, सिंधुदुर्ग (चिपी) एअरपोर्ट पोलीस ठाणे येथील पोलीस उप निरीक्षक प्रताप विठोबा नाईक, पोहेकॉ/894, मनोज मारुती मांजरेकर, पोलीस मुख्यालय येथील पोहेका/874 नेमणूक विश्वजीत झिलू परब, निवती पोलीस ठाणे नेमणूक महोहेकॉ/238 श्रीमती अर्चना गोविंद कुडाळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे नेमणूक पोहेकॉ/459 प्रकाश सहदेव कदम, पोलीस मुख्यालय नेमणूक पोहेकॉ/917 संजय ज्ञानोबा साळवी, जिल्हा विशेष शाखा नेमणूक पोहेका/61 डॉमनिक संतान डिसोजा, वैभववाडी पोलीस ठाणे नेमणूक पोकॉ/1247 राहुल भगावन तळसकर, यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करुन त्यांचा गौरव केलेला आहे.
सिंधुदुर्ग पोलीस दलातील मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीप्रत्र प्राप्त झाल्याने आम्ही उपरोक्त पोलीस अधिकारी व अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.