You are currently viewing ब्रह्माण्ड

ब्रह्माण्ड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ब्रह्माण्ड*

**********

गंगौघाचा ओघळ पावन

भिजवीत जातो सृष्टिला…

 

महापात्री अमोघ जीवन

कृतार्थी वरदान जीवाला…

 

वेलीवरी कळ्या उमलता

प्रसन्नतेचा बहर ऋतूला…

 

मृत्तिकेलाही गंध सुगंधी

तृप्तवुनी जातो आत्म्याला…

 

माहोल चैतन्याचा ऐश्वर्यी

भुलवीत जातो चराचराला…

 

अलौकिक , ब्रह्माण्ड सारे

घेऊनी जाते मुक्तीमोक्षाला…

 

अणूरेणू सारी त्याची माया

सर्वत्र , शोधुया भगवंताला…

***********************

*रचना क्र.७८ / २४ /४ /२०२४*

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा