You are currently viewing मानवत येथे काव्यगंध प्रातिनिधिक कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार

मानवत येथे काव्यगंध प्रातिनिधिक कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार

मानवत – दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामूहिक जयंती निमित्त श्रीगणेश रामचंद्र कत्रुवार फार्मसी महाविद्यालय आयोजित भव्य व्याख्यान सोहळ्या दरम्यान काव्यगंध या प्रातिनिधिक कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

यावेळी प्रसिद्ध व्याख्याते कवी अविनाश भारती सर,
पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ कदम सर, दलाल साहेब, हीबारे साहेब, प्रा.मुंडे सर, मु. कजेवाड सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुस्तक दिनाच्या दिवशी पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल अविनाश भारती सरांनी सहभागी कवी आणि प्रकाशनाला शुभेच्छा दिल्या व सर्व मान्यवरांनी पुस्तकाचे प्रकाशन केले.

ह्यावेळी प्राध्यापक गुणवंत अवचार सर हे सूत्रसंचालन करत होते. रोहिणी प्रकाशन प्रकाशित काव्यगंध हा प्रातिनिधिक कविता संग्रह आहे, रोहिणी माया रामू वाघमारे या संग्रहाच्या प्रकाशिका आहेत तर कवी कृष्णा राजू भालेराव हे संग्रहाचे संकलक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा