You are currently viewing मतदान जनजागृतीसाठी सावंतवाडी पालिका प्रशासनाचा पुढाकार…

मतदान जनजागृतीसाठी सावंतवाडी पालिका प्रशासनाचा पुढाकार…

मतदान जनजागृतीसाठी सावंतवाडी पालिका प्रशासनाचा पुढाकार…

विविध कार्यक्रमाचे आयोजन; दिड हजाराहून अधिक नागरीक सहभागी होणार…

सावंतवाडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या “स्वीप” कार्यक्रमांतर्गत सावंतवाडी नगर परिषदेमार्फत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर १० ते १३ एप्रिलला मतदार सेल्फी पाँईट उपक्रम, १४ ते १६ एप्रिलला मतदार शपथ उपक्रम, १७ ते १९ एप्रिलला मतदार स्वाक्षरी अभियान आदी कार्यक्रम सावंतवाडी शहरात राबवण्यात आले असून शहरातील नगरपरिषद कार्यालय, शिवउद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदीर, इंदिरा गांधी व्यापारी संकुल, स्टेट बँक ऑफ इंडिया, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, कळसुलकर इंग्लिश स्कूल, राणी पार्वतीदेवी हायस्कुल, मिलाग्रीस हायस्कुल, राजवाडा, एस.टी. बस स्थानक, वैश्यवाडा मारुती मंदीर, वेलनेस मेडिकल, वसंत प्लाझा गांधी चौक, जयप्रकाश चौक, सोनचिरैया उपजिविका केंद्र वैश्यवाडा अशा विविध शासकीय कार्यालय व सामाजिक संस्थांच्या ठिकाणी नागरीकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमामध्ये सावंतवाडी शहरातील सुमारे १५०० नागरीकांनी सहभाग नोंदविलेला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व रामनवमी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत नागरीकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. नगरपरिषद हद्दतील सर्व प्रभागामध्ये घंटागाडीद्वारे दररोज मतदान जनजागृती करण्यात येत आहे.

तसेच या कार्यक्रमांतर्गत २४ एप्रिलला लोकशाही दिंडी व मानवी शृंखलेद्वारे नागरीकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शिवउदयान येथे सकाळी ८ वाजता घेण्यात येणार आहे. त्यासोबतच २८ तारीख ला सायकल रॅलीद्वारे मतदान जनजागृती, १ में ला नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात स्थानिक लोककलाअंतर्गत दशावतार नाटयप्रयोगाद्वारे मतदान जनजागृती करण्यात येणार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत सावंतवाडी शहरातील नागरीकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होवून ७ मे ला होणाऱ्या मतदानादिवशी आपला मतदानाचा हक्क निश्चितपणे बजाविण्याचे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा