You are currently viewing सावंतवाडीत अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त “सफर पुस्तकांच्या दुनियेतली” प्रदर्शन

सावंतवाडीत अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त “सफर पुस्तकांच्या दुनियेतली” प्रदर्शन

अर्चना फाऊंडेशनच्या वतीने आयोजन

 

सावंतवाडी :

 

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांचा वाढदिवस दिनांक १ डिसेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे.

अर्चना फाऊंडेशनच्या वतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्याने “सफर पुस्तकांच्या दुनियेतली” भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. श्री देव नारायण मंदिर हॉल, मोती तलाव समोर, मेन रोड, सावंतवाडी येथे शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ ते मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २०२३ पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या प्रदर्शनचा लाभ घेता येणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. जेष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या शुभ हस्ते आणि माजी राज्यमंत्री प्रविणभाई भोसले, पत्रकार शिवप्रसाद देसाई, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, साहित्यिक प्रा. डॉ. गोविंद काजरेकर, कवयित्री डॉ. शरयू आसोलकर, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, प्रसिद्ध मालवणी कवी श्री. दादा मडकईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सर्वांनी आपल्या मित्र परिवार, कुटुंबासह या प्रदर्शनास भेट देऊन पुस्तकांच्या दुनियेची सफर करावी आणि ज्ञानाची शिदोरी सोबत न्यावी असे आवाहन अर्चना फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा