You are currently viewing आंबोली विहिरींमधील पाण्याचा उपसा बांधकामासाठी; तीव्र संताप

आंबोली विहिरींमधील पाण्याचा उपसा बांधकामासाठी; तीव्र संताप

*दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा; सामाजिक कार्यकर्ते अजित नार्वेकर*

 

सावंतवाडी / आंबोली :

 

सगळीकडे पाण्याची टंचाई सुरू असताना आंबोलीत मात्र विहिरींमधील पाणी बांधकामासाठी राजरोसपणे उपसले जात आहे. त्यामुळे आंबोलीतील महत्त्वाच्या विहिरी ज्या विहिरींमुळे आंबोली परिसरातील अनेक विहिरींमधील पाण्याची पातळी व्यवस्थित राहते अशा विहिरीचे पाणी पूर्ण तळ दिसेपर्यंत उपसण्यात आले आहे. त्यामुळे त्या विहिरीतील सजीव तडफडून मरत आहेत व पूर्णपणे पाणी संपले आहे. यामुळे संपूर्ण आंबोली बाजारपेठ परिसरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. याकडे आंबोलीतील सामाजिक कार्यकर्ते अजित नार्वेकर यांनी लक्ष देण्याचे संबंधित विभागांना आवाहन केले आहे. परंतु कोणीही लक्ष देत नसल्यामुळे आंबोली मध्ये पाणीटंचाई होणार आहे हे अटळ आहे. पिण्यासाठी पाण्याची वनवन सुरू असताना या ठिकाणी मात्र बांधकामासाठी पाणी वापरले जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संता व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी याकडे लक्ष द्यावे असे नार्वेकर यांनी सांगितले आहे. नार्वेकर यांनी सांगितले की त्या ठिकाणचे मासे व इतर सजीव तडफडून मरत आहेत. विहिरीचे पाणी पूर्णपणे काढले गेल्यामुळे आंबोलीत भीषण पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. संबंधित बांधकाम करणाऱ्यांनी पाणी कुठूनही विकत आणावे परंतु विहिरीतले पाणी काढू नये असे त्यांनी खडसावले आहे. याबाबत जर उपाययोजना झाली नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. काही विहिरी या वनविभागाच्या हद्दतीत येतात वनविभागानेही तात्काळ या विहिरींमधील पाण्याचे पंप काढण्याचे आदेश द्यावे असेही त्यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा