You are currently viewing जिल्हा पोलीस दलाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने करण्यात आलेली कारवाई

जिल्हा पोलीस दलाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने करण्यात आलेली कारवाई

जिल्हा पोलीस दलाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने करण्यात आलेली कारवाई

सिंधुदुर्गनगरी

 पोलीस दलाने लोकसभा निवडणुक -२०२४ शांततेत पार पडावी, निवडणुक पूर्व काळात व निवडणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे, शस्त्रे, अंमली पदार्थ व्यवसायात गुंतलेल्या इसमांवर कडक कारवाई केलेली आहे.

जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासुन १२ ठिकाणी  आंतरजिल्हा चेकपोस्ट १० ठिकाणी आंतरराज्य चेकपोस्ट तसेच इतर विभागासह १९  ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके  व ८ भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कारवाई करून २ सिंगल बॅरल बोअर बंदुका, १ रिव्हॉल्वर, १८ जिवंत काडतुसे, २००० जिलेटिनच्या कांड्या,१००० डिटोनेटर असे  स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत.

 अवैध मद्य विक्री, वाहतुक, करणाऱ्या ८६ इसमांवर ७६ गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन त्यांच्याकडुन १०८६४.९९४ लिटर दारु किंमत ५०,०८,९५३/-  रुपयाची दारु, १३ वाहने किंमत ३७,८५,०००/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच अंमली पदार्थ  बाळगणाऱ्या ३ इसमांवर कारवाई करण्यात आलेली असुन त्यांच्याकडुन २२७ मिलि ग्रॅम गांजा किंमत १७००/- रुपयाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे.

            आचारसंहिते दरम्यान  शांतता भंग करणाऱ्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील  करण्यात आलेली असून आतापर्यंत जिल्ह्यात ३९१ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून अंतरिम तसेच अंतिम बंधपत्र घेण्याची कारवाई सुरू आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये एका टोळीला तडीपार करण्यात आलेले आहे.   महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अन्वये २ इसमांवर हद्दपारीची कार्यवाही सुरू आहे. अवैधरित्या दारू वाहतूक व विक्री करणाऱ्या ५३  इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. शांतता राखण्यासाठी crpc कलम १४९ प्रमाणे २६६  लोकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.

             लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, सर्वांनी निर्भयपणे मतदान हक्क बजाविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील तालुकाच्या ठिकाणी आणि मोठ्या गावांमध्ये पोलीसांचे पथ संचलन घेण्यात आलेल आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध दारु, अंमली पदार्थ, अवैध शस्त्रे याबाबत कडक कारवाई करून  जिल्ह्यात लोकसभा निवडणुक २०२४ शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा