You are currently viewing पत्रादेवी चेकपोस्टवर झालेल्या भीषण अपघातात एक ठार

पत्रादेवी चेकपोस्टवर झालेल्या भीषण अपघातात एक ठार

पत्रादेवी चेकपोस्टवर झालेल्या भीषण अपघातात एक ठार

एकाची प्रकृती चिंताजनक; पाच लहान मुले गंभीर जखमी

बांदा

गोव्यातून लातूरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला पत्रादेवी चेकपोस्टवर भीषण अपघात झाला आहे. कार चालकाने उभ्या ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात एक इसम ठार झाला असून एका पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच पाच लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. पैकी दोन लहान मुलांना तातडीने गोवा बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. कार चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्यालाही उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर एका गंभीर जखमी महिलेला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठवण्यात आले. हा अपघात पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.

सर्व जखमी तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ गाडीत अडकून पडले होते. पत्रा देवी चेक पोस्टवर अपघात होऊ नये एक्साइज आरटीओ च्या कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळी सहकार्य न केल्याने स्थानिक संतप्त झाले पोलीस घटनास्थळी आल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्यास सहभाग घेतला जखमी ना गाडीतून बाहेर काढत ॲम्बुलन्स मधून बांबोळी रुग्णालयाला पाठवण्यासाठी सहकार्य केले. जखमींची नावे प्राप्त झालेली नाहीत. पैकी एका इसमाची तब्येत चिंताजनक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 7 =