You are currently viewing फोंडाघाट मध्ये विजेचा लपंडाव सुरू

फोंडाघाट मध्ये विजेचा लपंडाव सुरू

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी घेणार आमदार नितेश राणे व वीज मंत्री यांची भेट

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये दरदिवशी कमीत कमी २५ वेळा विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. २० तारीख पर्यंत विजपुरवठा सुरळीत झाला नाहीतर सर्व व्यापारी वर्गासह MSEB घेराव घालणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. या वर्षातच विद्युत पुरवठ्याला का प्राॅब्लेम येतोय यासाठी आंदोलन करणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे निवेदन आमदार नितेशजी राणे तसेच विज मंत्री यांना अजित नाडकर्णी स्वतः सादर करणार आहेत. फोंडाघाट MSEB ला ३ ठिकाणाहुन वीज पुरवठा होतो. लाईन कुर्ली डॅमचे लाईट या ठिकाणी मिळाली पाहीजे असे नाडकर्णी यांनी नमूद केले आहे. आमदार नितेश राणे यांची समक्ष भेट घेऊन फोंडाघाट वासीयांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठा बाबत चर्चा करणार आहेत आणि त्यातून तोडगा न निघाल्यास आंदोलन करणार असा इशारा प्रसिद्धी पत्रकार द्वारे नाडकर्णी यांनी दिला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा